१.१२.२०१०

पैसा आणि आपण . . .

Paisa, Maney'पैश्यासाठी माणुस जगतो, पैश्यासाठी मरतो' या आशयाच्या काही ओळी माझ्या कानावर पडल्या, मग असाच विचार आला कि खरंच राव आपण सगळे फक्त पैश्यासाठी न्हवे तर पैश्यासाठीच जगतो खरंय की नाही आपण जे काही या जगात करतो ते पैश्यासाठी . . . परवा एक दिवस पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले तेव्हा मनात विचार आला की या जगातील प्रत्येक जण त्या काही ठराविक चित्र छापलेल्या कागदाच्या तुकड्यांवर किती अवलंबून आहे . . त्या तुकड्यांना जे देवाने नाहीटर माणसानेच देवाण-घेवाणाचे साधन बनवले . . त्यांना मिळवण्यासाठी प्रत्येकजण आयुष्यभर झगडतो, पडेल ते काम करतो . . आणि काम मिळवण्यासाठी शिकतो . . . कधीकधी तर फक्त चार नोटा जास्त मिळवण्यासाठी मनाविरुद्ध कामाचे क्षेत्र निवडतो. आणि मग स्वताच्याच मनात कुजत राहतो . . . पण इथे त्याची काहीच चूक नसते कारण हे जग फक्त पैश्यावर चालते . . . 'ज्याच्याकडे पैसा - तो राजा' हा या जगाचा अलिखित नियमच बनलाय. मग काय आपले आयुष्य जर आरामात जगायचे असेल, वाढत्या महागाईला तोंड द्यायचे असेल तर पैसा तर कमवावाच लागणार . . मग काय ओवरटाईम काम किंवा मग जोडधंदा ठरलेलाच . . . काही लोक पैसा कमावण्यासाठी वाईट कामाला लागतात, पैश्यासाठी चोऱ्या करणे, दरोडा टाकणे एवढेच नाही तर कुणाच्या जीवावर देखील उठतात . . भ्रष्टाचार, चोऱ्या, खून हे माणसाच्या अतृप्तपणाची लक्षणे आहेत.
काहींचे असे म्हणणे असते की आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा-भावना दूर तर ठेवाव्याच लागणार . . पण पैश्यामुळे मानसन्मान तर मिळेल पण मनशांती नाही . . आत्ता 3 idiots पहिला . . त्यात हेच सांगितले आहे . . की कधीपण स्वतःच्या मनाचे पहिले ऐका . . जिथे तुम्हाला आनंद मिळेल असेच काम करा . . मग तुम्ही त्यात यशस्वी नक्कीच व्हाल . . आणि मग काय यश मिळाले की नाव होईल आणि पैसाहि येईल . . आपण पैश्यामागे धावण्यापेक्षा त्याला आपल्यामागे धावायला लावा . . पैश्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्यातला आनंद वाया जाऊन देऊ नका. मी काही कोणाला उपदेश करत नाही . . परंतु माझे एकाच सांगणे आहे की देवाने आपल्याला जन्म दिला तो काय पैसा कमवायला . . माझे म्हणणे आहे की फक्त पैश्यामागे धावून काही उपयोग नाही कारण त्याला सीमा नाही । . आणि आयुष्यभर फक्त पैश्यामागे धावत राहिलो तरी आयुष्य पुरणार नाही आपल्याला . . .

तेंव्हा पैसा भरपूर कमवा पण आपले आवडते काम करून . .

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा