बरेच दिवस काही महत्वाच्या कामांमुळे ब्लॉगकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण तरीपण मराठी ब्लॉगविश्वात राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, या काळात वेळ मिळेल तेंव्हा इतरांचे ब्लॉग वाचले, त्यावर Comments पण दिल्या . . काही मित्रांना स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यासाठी मदत केली . . मग लक्षात आले कि या ब्लॉगविश्वाशी एक प्रकारचे वेगळे नाते निर्माण झाले आहे . .
http://www.marathiblogs.net/ या मराठी ब्लॉगर्सच्या संकेतस्थळावर ब्लॉगर्सचे एकत्र कुटुंब निर्माण झाले आहे. इथे प्रत्येक जण सुरवातीला नवखा असतो पण नंतर त्याने लिहलेल्या लेखावर आलेल्या Comments मधून तो शिकत जातो आणि मग एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे तो इथे रुळतो . . आणि या ब्लॉगर्सच्या कुटुंबाचा एक भाग बनतो . . आणि मग स्वतःसुद्धा चांगले लेख लिहू लागतो . . आणि या कुटुंबातील सदस्यसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ती वाढतच राहील . . यातून आता नवीन चळवळ उभी राहत आहे. आत्ताच मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला मेळावा पार पडला . . दुर्दैवाने त्यावेळी उपस्थित राहता आले नाही . . पण आत्तापर्यंत केवळ ब्लॉगवरील Comments च्या माध्यमातून झालेली ओळख , त्यातूनच विश्वास ठेवून दिलेले आमंत्रण यातून हा पहिलावहिला ब्लॉगर्स मेळावा पार पडला. या सगळ्याचे श्रेय मराठी ब्लॉग विश्वातल्या काही शिलेदारांना जाते . . यात प्रामुख्याने पंकज, भुंगा, महेंद्रजी, सुहास पेठे, अनिकेत समुद्र इत्यादींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. आत्ता १-२ दिवसांपूर्वी पंकजच्या ब्लॉगवर मला कळले कि मराठी ब्लॉगर्सनी आता Google Group वर सुद्धा एक स्वतंत्र विभाग उघडला आहे . . ते पाहून खूप आनंद झाला. आणि लगेच ती लिंक माझ्या अनेक ब्लॉगर्स मित्रांना पाठवली. अश्या तर्हेने हि चळवळ देश-विदेशातील मराठी ब्लॉगर्स पर्यंत पोहचेल असा विश्वास वाटतो . . यासाठी तुच्याकडे काही नवीन क्लुप्त्या असतील तर जरूर सांगा . . आपण सर्व मिळून त्या प्रत्यक्षात आणायचं प्रयत्न करू . . .
चला आता काहीतरी नवीन पोस्ट टाकायला हवी . . तर आपण भेटत राहूच . .
2 comments:
सर्व प्रथम तुषार तुला मनातुन धन्यवाद कारण तुच माझा हात धरुन या मराठीब्लाॅर्गस कुटूंबात आणलं, आणि कुटूंबाची ओळख करुन दिली, तस या कुटूंबात खुप मोठं-मोठी ‘भाउलोक’ आहेत, पण या कुटूंबातला माझा लडका भाउ तुच, तुला अनेक शुभेच्छा सतत अशीच प्रगती कर आणि पोस्ट टाकत राहा,
पंकज
आनंद झाला वाचून. मी पण ब्लॉगर नवीन अहो. आता कुठे लिहायला सुरुवात केली आहे. माझ्यासारख्या नवख्याला अजून खूप काही शिकायचं आहे. आपल्या सर्वांच्या साथीने पुढचा प्रवास करायचा आहे. पुढील प्रवासात आपणासर्वांच मार्गदर्शन लाभो हीच इच्छा. धन्यवाद.
अनिकेत भांदककर.
टिप्पणी पोस्ट करा